घरमहाराष्ट्रधक्कादायक! कोल्हापुरात सापडले ६९ गावठी बॉम्ब

धक्कादायक! कोल्हापुरात सापडले ६९ गावठी बॉम्ब

Subscribe

कोल्हापुरमधील हातकणंगले जिल्ह्यातील माले मुडशिंगी येथून ६९ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूर मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोल्हापुरात गावठी बॉम्ब सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोघांना हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथून अटक करण्यात आली आहे. विलास जाधव आणि आनंद जाधव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे राहत्या घरात बॉम्ब तयार करत असून त्यांच्याकडून पोलिसांनी ६९ गावटी बॉम्ब जप्त केले आहेत. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जिल्हा पोलिसांनी रेल्वे स्थानक, बसस्थानके, धार्मिक स्थळे अशा अनेक ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बॉम्बला रक्तीच्या आवरणाचा वापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावठी बॉम्बला आवरणासाठी रक्तीचा वापर करत असून रानडुक्कराची शिकारीसाठी वापर करत असल्याची दोघा आरोपींनी कबुली दिली आहे. याप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेचे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisement -

कोल्हापुरात भीती वातावरण पसरले

दरम्यान कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. मतदानाच्या दिवशी देखील कोल्हापुरात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा हुंबळी रेल्वे स्थानकात स्फोट झाला. त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -