घरमहाराष्ट्रबिबट बछडे त्यांच्या आईजवळ सुपूर्द

बिबट बछडे त्यांच्या आईजवळ सुपूर्द

Subscribe

पुण्याच्या जुन्नर परिसरात दोन वेगवेकगळ्या ठिकाणी बिबट बछडे सापडले होते. या बछड्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

पुण्याच्या जुन्नर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट बछडे सापडले आहेत. या दोन्ही बछड्यांना मादी आईच्या कुशीत सुखरूप पोहचवण्यात वन विभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राला यश आले आहे. पुण्याच्या लेण्यांद्री आणि वडगाव आनंद येथे बछडे सापडले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

जुन्नर परिसरातील वडगाव आनंद येथे ऊसतोड करत असताना मजुरांना बिबट बछडा सापडला होता. संबंधित घटनेची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्राला देण्यात आली. यावेळी डॉ.अजय देशमुख हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ज्या ठिकाणी बिबट बछडा सापडला होता त्याच ठिकाणी सुखरूप ठेवला, नेमकं त्याचवेळी दुसरा कॉल हा लेण्यांद्री येथून आल्याने देशमुख यांनी दोन वेगवेगळ्या टीम केल्या. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन छोट्या बिबट बछड्याला ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी मिळाला होता त्याच ठिकाणी सुखरूप ठेवले. दोन्ही बिबट हे त्यांच्या आई ला रात्री ०९:१० आणि ०८:४० वाजता सुखरूप मिळाले असून याचे कौतुक सर्वत्र होत आहे. खरतर बिबट मादी ही बछडा न मिळाल्यास अत्यंत आक्रमक होते. त्यामुळे तिला बछडा भेटण महत्वाचं असत.ही कामगिरी डॉ.अजय देशमुख, बापू येळे, अजित शिंदे,महेंद्र यांनी कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -