घरमहाराष्ट्र‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’ दारुच्या बॉटलवर लिहिला जाणार संदेश

‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’ दारुच्या बॉटलवर लिहिला जाणार संदेश

Subscribe

अन्न आणि सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर लागू होणार आहेत. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मद्यपेय बाटल्यांवर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाव्दारे ठरवून देण्यात आलेले मापदंड अंकित करने बंधनकारक करण्यात आले असून याची अमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती राज्य शुल्क उत्पादन आयुक्त प्राजक्ता लंवगारे यांनी दिली.अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या एफडीए भवन येथे बुधवार १३ मार्चला सर्व राज्याच्या राज्य शुल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्याच्या शुल्क उत्पादन आयुक्त श्रीमती लंवगारे आणि सहआयुक्त अन्न आणि औषध प्रशासन सी.बी. पवार उपस्थित होते.

या बैठकीत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाव्दारे मद्यपेय मानक नियम २०१८ नुसार ठरवून दिलेल्या नियमांची अमलबजावणी काटेकोरपणाने व्हावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

२००६ शासन निर्णय लागू

२००६ च्या शासन निर्णयाप्रामाणे सर्व प्रकारची मद्यपेय आता अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या कक्षेत आलेले आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात ठरवून दिलेले नियम पालन करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मद्यपेय बाटलींच्या बाहेरील बाजूस मद्यांमध्ये समाविष्ट असलेले घटक, प्रमाण, ऍलर्जीक, वैधानिक चेतावणी नमुद करणे आवश्यक आहे. ‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’, ‘सुरक्षित रहा, मद्यपान करून गाडी चालवु नका’ असे १ एप्रिल २०१९ पासून प्रत्येक मद्यपेयावर लिहीणे बंधनकारक असेल. ही वाक्य इंग्रजीसह मातृभाषेत लिहीणे सक्तीचे राहील.

अंमलबजावणीस महाराष्ट्र सज्ज

प्रत्येक मद्यपेय बाटलीवर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने ठरवून दिलेले ‘मद्यपान हे आरोग्याला धोकादायक’ ‘सुरक्षित रहा, मद्यपान करून गाडी चालवु नका’ ही वाक्य १ एप्रिल २०१९ पासून लिहीणे बंधनकारक असेल. या तपासण्यासाठी राज्यातील राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय आणि अन्न व औषधी प्रशासन विभाग सज्ज असल्याचे आयुक्त श्रीमती लंवगारे यांनी सांगितले.

- Advertisement -

१ एप्रिलपासून अंमलबजावणी

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाची नियमावली येण्यापुर्वी उत्तम गुणवत्ता दाखविण्यासाठी मद्यपेय उत्पादक ‘ब्रिटीश मानक संस्थे’ कडून प्रामाणिकृत असल्याचे लेबल अंकित करीत असत. आता मात्र तसे करणे अवैद्य मानले जाणार आहे. मद्यपेय उत्पादकांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने आखुन दिलेल्या नियामवलीचे पालन करने अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या शुल्क उत्पादन आयुक्तालयाने राज्यातील सर्वच मद्यपेय निर्मित उत्पादकांशी, भागधारकांशी, किरकोळ विक्रेतांशी बैठकी घेऊन त्यांना याबाबत अवगत केले आहे. त्यामुळे राज्यात १ एप्रिलपासून याची अमलबजावणी करणे सोपे होईल, अशी माहिती श्रीमती लंवगारे यांनी बैठकीनंतर दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -