घरमहाराष्ट्र22 तारखेला दिवाळी साजरी करू, फक्त मोदींनी गरीबांना हजार-हजार रुपये द्यावेत; Prakash...

22 तारखेला दिवाळी साजरी करू, फक्त मोदींनी गरीबांना हजार-हजार रुपये द्यावेत; Prakash Ambedkar यांची मागणी

Subscribe

मुंबई : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. रामलल्लाची लोभस मूर्ती मंदिरात बसवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राम भक्तांकडून अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात प्रत्येकाच्या मुखी ‘रामनाम’ असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याचपार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मागणी करताना म्हटले की, पंतप्रधानांच्या या इच्छापूर्तीसाठी आम्ही 22 तारखेला दिवाळी साजरी करायला तयार आहोत, फक्त यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एक-एक हजार रुपये द्यावेत. (Lets celebrate Diwali on 22nd only Modi should give thousand thousand rupees to the poor Prakash Ambedkar demand)

हेही वाचा – जागा वाटप अद्याप का नाही, याचं प्रामाणिक उत्तर MVAने जनतेला द्यावं; Prakash Ambedkar यांची मागणी

- Advertisement -

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मी वर्तमानपत्रातून वाचतोय की, मला आमंत्रण येणार आहे. परंतु मला आतापर्यंत कुठलंही आमंत्रण आलेलं नाही. त्यामुळे मी आमंत्रणाची वाट पाहत आहे, असे म्हणत त्यांनी देशभारत दिवाळी साजरी करण्याच्या पंतप्रधानांच्या आव्हानावर भाष्य केले.

हेही वाचा – MLA Disqualification : नार्वेकरांनी म्हटले पाहिजे, ‘जा नाही देत निकाल’; प्रकाश आंबेडकरांचा मिश्कील टोला

- Advertisement -

मोदींनी हजार रुपये द्यावेत

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यादिवशी देशभरात दिवाळी साजरी करा. मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं मिशन आपण सगळ्यांनी मान्य केलं, तसं हेही आम्ही मान्य करु, फक्त आमची मोदींना एवढीच विनंती आहे की, त्यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एक-एक हजार रुपये द्यावेत. जेणेकरुन त्यांना दिवाळी साजरी करता येईल. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी त्यांच्याच पैशातून दिवाळी साजरी करायची, असं त्यांचं (मोदी) म्हणणं असेल. त्यामुळे संबंधित कुटुंबांना तशी दिवाळी साजरी केली, तर त्यांच्या मुलांना महिन्याभरात गोड-धोड खाण्याचा त्याग करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या इच्छापूर्तीसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एक-एक हजार रुपये द्यावेत, असा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -