घरदेश-विदेशLive Update : मुंबईतील साफेमा कार्यालयात डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या शेतांचा होणार...

Live Update : मुंबईतील साफेमा कार्यालयात डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या शेतांचा होणार लिलाव

Subscribe

मुंबईतील साफेमा कार्यालयात डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या शेतांचा होणार लिलाव

दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत मुंबईतील साफेमा कार्यालयात डॉन दाऊद इब्राहिमच्या आईच्या शेतांचा लिलाव होणार आहे. हा लिलाव तीन प्रकारे होणार आहे. शेतांची किंमत 19 लाख 21 हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पालघरमध्ये एकनाथ शिंदेंचा ठाकरे आणि मनसेला धक्का

पालघरचे अनेक पदाधिकाऱ्यांदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

काँग्रेसचे सरचिटणीसही शिवसेनेत

वरळीतल्या माजी नगरसेविका रत्ना महाले शिंदे गटात


एका दिवसात 945 फुकट्या प्रवाशांवर ‘बेस्ट’ कडून कारवाई


नागपूरच्या वाडी परिसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

भरधाव कार समोरच्या मार्गिकवर जाऊन ट्रकवर आदळल्याने आई आणि मुलाचा मृत्यू तर मुलगी गंभीर


IND VS SA : दुसऱ्या कसोटीत भारताचा 7 विकेट्सने विजय


रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदी नियुक्ती

1988 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदी नियुक्ती जाहीर झाली आहे. गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.


देशाच्या अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही – शरद पवार

400 हून अधिक जागा जिंकू असं भाजपाकडून सातत्याने सांगितलं जातं, मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता नाही, असे शरद पवार म्हणाले.


डॉ. रामास्वामी, आयुक्त कौशल्य विकास यांची सचिव (लेखा व कोषागार) वित्त विभागाकडे बदली करण्यात आली आहे.

महादेव कुसेकर, अध्यक्ष कास्ट वैधता समिती यवतमाळ यांची VCMD, MSRTC मध्ये बदली करण्यात आली आहे.


राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ( संक्षिप्त )

* नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा

( वित्त विभाग)

* अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये

( नगरविकास विभाग )

* दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.

( दुग्धव्यवसाय विकास)

* विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार

( जलसंपदा विभाग)

* मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.

( वित्त विभाग)

* पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा

( वस्त्रोद्योग)

* रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ

( वस्त्रोद्योग विभाग)

* द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार

( उद्योग विभाग)

* नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता

( परिवहन विभाग)

* सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला

( सहकार विभाग)

राज्य मंत्रिमंडळ बैठक

– शिवडी- नवाशेवा या अटल सेतूसाठी आजच्या मंत्रिमंडळ टोल निश्चित

– 250 रुपये टोल निश्चित

– 250 रुपये प्रमाणे 21.8 किलोमीटरच्या या मार्गावर प्रती किलोमीटर 11.46 रुपये टोल आकारला जाणार


22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; ⁠मंत्री मंगलप्रभात लोढांची मागणी

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल आकारणार

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय


मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी

रत्नागिरीत उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रम

कशेटी घाट ते पेणच्या खारपेडापर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

भाजपा आमदार राम कदम यांनी ही तक्रार दाखल केली आहे

आव्हाडांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे.


नवी मुंबईतील पावणे MIDC परिसरात भीषण आग

मेहक केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना

घटनास्थळी अग्नीशमन दलाचे अधिकारी दाखल


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. त्यांनी त्यांचं लेखी उत्तर ईडीला पाठवलंय. तसंच, तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर असल्याचं छापा टाकून त्यांना अटकही करू शकते, अशा दावाही काही आप नेत्यांनी केला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -