घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर; अधिकाऱ्यांना फुटला...

Lok Sabha 2024: उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी आणली 10 हजारांची चिल्लर; अधिकाऱ्यांना फुटला घाम

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार यांनी 10 हजार रुपयांची चक्क चिल्लर आणली.

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना बुलढाणा जिल्ह्यातील महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार यांनी 10 हजार रुपयांची चक्क चिल्लर आणली. त्यांनी आणलेली चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला. (Lok Sabha 2024 Candidate from Buldhana Aslam Shah Hasan Shah brings chiller of 10 thousand )

40 मिनिटं मोजणी सुरू होती (BulDhana, Aslam Shah Hasan Shah)

आज डिपॉझिट भरण्यासाठी महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार अस्लम शहा हसन शहा यांनी तब्बल दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) आणली. उर्वरित 15 हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. त्यांनी दहा हजारांची नाणी अर्जाच्या टेबलावर कर्मचाऱ्यांसमोर ठेवताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घाम फुटला. परंतु, डिपॉझिट रकमेसंदर्भात कोणताही नियम नसल्याने त्यांना 15 हजारांच्या नोटा अन् 10 हजारांची चिल्लर घेणं बंधनकारक होतं. या मोजणीला तब्बल 40 मिनिटं लागली. मोजणी झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.

- Advertisement -

यवतमाळ वाशिम येथेही असाच प्रकार घडला

मनोज गेडाम या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरताना 12 हजार 500 रुपयाची चिल्लर निवडणूक आयोगाला नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली. ही रक्कम मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना लोकं गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. मी गोर गरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक, दोन, पाच आणि दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक मी जिंकणार असे, त्यांनी सांगितले आहे. जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे, असं मनोज गेडाम यांनी सांगितले आहे

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : 80 कोटींची मालमत्ता तर, 39 कोटींची उसनवारी; विदर्भातील उमेदवाराचे शपथपत्र)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -