घरमहाराष्ट्रSanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची...

Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका

Subscribe

जित पवारांची ख्याती सध्या धमकीबहाद्दर अशी झालीय, ते रोज उठून मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी संजय राऊत यांनी केली.

नाशिक : अजित पवारांची ख्याती सध्या धमकीबहाद्दर अशी झालीय, ते रोज उठून मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केली आहे. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar threatens Narendra Modi Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले की, मोदींनी आमचे बारा लोकं घेतले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी. मोदी यांची भ्रष्टाचार विरोधाची बोंब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत. मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : उत्तर मध्य मुंबईतून अजूनही उमेदवार बदलायचं असेल तर…; संजय राऊत असं का म्हणाले?

2019 साली शरद पवारांनी सांगितले म्हणूनच भाजपासोबत गेलो होतो, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे अजून किती वेळा बोलणार? सर्व गुळगुळीत झाले आहे. त्यांच्याकडे आता दुसरे काही नाही बोलायला म्हणून धमकी देत आहेत. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला.

- Advertisement -

आज देशात राहुल गांधींसाठी वातावरण (Atmosphere for Rahul Gandhi in the country today)

यंदाच्या लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडी किती जागा जिंकेल या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, भाजपासारखे 45 प्लस असे हवेचील नारे आम्ही करत नाही. महाविकास आघाडी 30 ते 35 जागांवर जिंकेल, एवढंच नाही तर चुरशीची लढत असलेल्या ठिकाणीही आम्ही जिंकू शकतो. कारण देशात भाजपा आणि नरेंद्र मोदींविरोधात प्रंचड रोष आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे वातावरण होतं, तसेच वातावरण आज देशात राहुल गांधी यांच्यासाठी आहे. जनतेला देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व हवे आहे. त्यांच्या सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या नावाखाली जे जमीन घोटाळे झाले आहेत, त्यात सर्व भाजपाचे नेते आहेत. सुमारे 2 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. स्वस्त:त जमिनी घेत त्या राममंदिर ट्रस्टला दसपट भावाने विकण्यात आल्या. ते कोणाला उघडे करण्याची धमकी देत आहेत, ते स्वतःच नागडे झाले आहेत, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -