घरताज्या घडामोडीSanjay Raut : शिवसेना ही सर्टिफाइड वाघ म्हणत संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा;...

Sanjay Raut : शिवसेना ही सर्टिफाइड वाघ म्हणत संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा; म्हणाले…

Subscribe

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला जर वाघ म्हणून सिद्ध करायाचे असेल तर त्यांनी मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्यांनी मिळून विजयी केले पाहिजे. त्यानंतर 4 जूनला आम्ही येऊ आणि सगळ्या वाघांचा सत्कार करू, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सांगली : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला जर वाघ म्हणून सिद्ध करायाचे असेल तर त्यांनी मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्यांनी मिळून विजयी केले पाहिजे. त्यानंतर 4 जूनला आम्ही येऊ आणि सगळ्या वाघांचा सत्कार करू, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. शिवाय, ‘शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे. आमचे बोधचिन्हच वाघ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेले आहे’, असेही संजय राऊत म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut Slams Congress In Sangli)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज (3 मे) सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत नुकताच संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. “महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना स्वत:ला जर वाघ म्हणून सिद्ध करायाचे असेल तर त्यांनी मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्यांनी मिळून विजयी केले पाहिजे. त्यानंतर 4 जूनला आम्ही येऊ आणि सगळ्या वाघांचा सत्कार करू. त्यावेळी आम्ही त्यांना सांगू की तुम्ही वाघ आहात. पण शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे. आमचे बोधचिन्हच वाघ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेले आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.

- Advertisement -

“वाघ हा उत्तर शिकारी असला तरी, नेहमीच समोरून हल्ला करतो. वाघ कधीच झुडपात बसून वाघ कारस्थान करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहेत हे कळेल. पण सांगलीतील जनता ही वाघासारखी आहे. ही जनता कोणतीही कारस्थान, डावपेच सहन न करता पेहलवान चंद्रहार पाटील यांच्या पाठिशी उभे राहतील”, असाही टोला यावेळी संजय राऊतांनी लगावला.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर

- Advertisement -

“काही लोकांचे असे म्हणणं आहे की, चंद्रहार पाटील थोडे कमी पडतात. पण चंद्रहार पाटील कुठे कमी पडतात. कमी म्हणजे काय? त्यांचे स्वत:चे साखर कारखाने नाहीत. साखर कारखाने असतील तर त्यांनी बुडवेलेले नाहीत. कर्ज बुडवेलेली नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेली नाहीत. संस्था बुडवलेली नाही. हाच त्यांचा कमजोर पणा आहे का, पण ही त्यांची ताकद असून ते प्रामाणिक आहेत. पण असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षांनी अनेक ठिकाणी उभे केलेले आहेत. आम्हालाही वाटतं हा उमेदवार कमजोर आहे. पण आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत. मग तो काँग्रेसचा असेल किंवा इतर कोणत्या पक्षाचा असेल. पण आम्ही त्या उमेदवाराला कमजोर समजत नाहीत. कारण आम्ही वाघ आहोत. आम्ही त्याला आमच्या बरोबर पुढे नेऊ आणि विजयी करू. आम्ही नावाचे वाघ नाही. तसेच, शिवसेना म्हणून त्या कमजोर उमेदवाराला विजयी करणे ही आमची जबाबदारी आहे”, अशीही टीका संजय राऊतांनी काँग्रेसवर केली.

“वाघाच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. वाघ खुलेपणाने फिरतो आणि डरकाळी फोडतो. पण अलिकडच्या काळात मला सांगलीत बरेच वाघ दिसायला लागले असून त्या वाघांचे जतन करणे गरजेचे आहे. माझी सांगलीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. माझी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे. जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने चर्चा करतो”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – RAIGAD NEWS : रायगडमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील जिल्हा प्रमुखावर अज्ञातांचा हल्ला; गाडीच्या फोडल्या काचा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -