घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक २०१९: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

लोकसभा निवडणूक २०१९: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Subscribe

आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच उर्वरीत उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्यात येणार आहे. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी ७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या ७ जागांसाठी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच उर्वरीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

बीड लोकसभा मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहे. भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रितम मुंडे अर्ज दाखल करणार आणि बीड शहरात रॅली काढणार आहे. त्यानंतर ६ वाजता भाजपची सभा होणार असून या सभेला प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे दुपारी २ वाजता अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली निघणार आहे.

- Advertisement -

नागपूर लोकसभा मतदार संघासाठी भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ११ वाजता दोघेही उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याआधी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाची रॅली निघणार आहे. नितीन गडकरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने यंदा नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. तरुण उमेदवार सुनील मेंढे आज भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुध्दे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रॅली काढून हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

- Advertisement -

रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे आणि बसपाचे उमेदवार किशोर गजभिये हे देखील आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर दुसरीकडे गडचिरोली लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, यवतमाळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी उमेदवारी अर्ज भरणार आहे. दोन्ही उमेदवार रॅली काढून त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार हंसराज अहीर आणि काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर देखिल आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हसंराज अहिर १० वाजता उमेदवारी अर्ज भरतील. त्याआधी त्यांची रॅली काढण्यात येणार आहे. तर काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -