घरमहाराष्ट्रसरकार पुढं आव्हान, ९ दिवसात १० विधेयकं

सरकार पुढं आव्हान, ९ दिवसात १० विधेयकं

Subscribe

विधीमंडळाचे हिवाळी चांगलंच गाजणार आहे. विरोधक जलयुक्त शिवार, महागाई, दुष्काळ या मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सरकार देखील त्याच तयारीनं मैदानात उतरेल.

१९ नोव्हेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार असलं तरी, सुट्यांमुळे केवळ नऊच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. ९ दिवस चालणाऱ्या या विधानसभेमध्ये ८ विधेयके तर, विधानपरिषदेमध्ये दोन विधेयके प्रलंबित आहेत. विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज समितीच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना गिरीष बापट यांनी गरज भासल्यास सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्यात येईल. तसेच शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचे दिवस वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. अशी माहिती दिली. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनामध्ये दुष्काळावर देखील चर्चा होणार आहे.

विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशनाप्रमाणे हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. जलयुक्त शिवार, महागाई, दुष्काळ या मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना विरोधक करतील. त्यांच्या या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सरकार देखील त्याच तयारीनं मैदानात उतरेल.

- Advertisement -

विधानसभेमध्ये कोणती विधेयके आहेत प्रलंबित?

१) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन)(दुसरी सुधारणा विधेयक, २०१७)
२) महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकार जमा करण्याबाबत विधेयक, २०१८
३) हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०१८
४) मुंबई महानगर पालिका (सुधारणा)विधेयक २०१८
५) महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक
६) महाराष्ट्र अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती सुधारणा विधेयक, २०१८
७) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनिमय) सुधारणा विधेयक २०१८
८) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक, २०१८

विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके

१) महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक, २०१८
२) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनिमय सुधारणा विधेयक, २०१८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -