घरमहाराष्ट्रMaharashtra Rain : कोकणात पावसाचे रौद्र रूप, गावांचा संपर्क तुटला; मराठवाड्याला बरसण्याची...

Maharashtra Rain : कोकणात पावसाचे रौद्र रूप, गावांचा संपर्क तुटला; मराठवाड्याला बरसण्याची प्रतीक्षा

Subscribe

Maharashtra Rain : राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मागील काही दिवसात दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. अशातच कोकणात (Kokan) आज पावसाने थैमान घातले आहे. खेड (Khed) दापोली (Dapoli) मुख्य राज्यमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच खेड आणि चिपळूण (Chiplun) येथे पुराचे पाणी भरल्यामुळे NDRF पथक दाखल झाले आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस न पडल्याने मराठवाड्यातील जनतेची चिंता वाढवली आहे. (Maharashtra Rain Heavy rains in Konkan villages cut off Waiting for Marathwada to rain)

हेही वाचा – Maharashtra Monsoon Session 2023 : कांदा उत्पादकांच्या अनुदानाबाबत मंत्री सत्तारांकडून महत्त्वाची घोषणा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिष्ठी जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे चिपळूण, खेड, महाड  आणि पोलादपूर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तसेच या परिसरातील अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. तसेच चिपळूण, गुहागर, विजापूर या मार्गावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खेड व चिपळूणमध्ये पुन्हा एकदा पुराचे पाणी भरल्यामुळे 2 वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच ग्रामीण भागातील एसटी वाहतूकही कोलमडली असून मुसळधार पावसामुळे खेड दापोली तालुक्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा – Maharashtra Monsoon : मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी

- Advertisement -

शाळा महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान, आज कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे चिपळूण खेड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर रायगड जिल्हा प्रशासनाकडूनही शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचा – आम्ही वंदे मातरम् बोलू शकत नाही कारण…, अबू आझमींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस कडाडले

मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम

राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने 46 दिवसांमध्ये केवळ 22.8 टक्केच हजेरी लावली असून आतापर्यंत 20 टक्के तूट कायम आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांसह मध्यम 107 आणि लघु 749 प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. धक्कादायक बाब म्हणजे 80 हून अधिक लघु प्रकल्पांत पाणीच नाही, तर 350 प्रकल्प जोत्याच्या खाली आले आहेत. ग्रामीण भागातील तहान भागविणारे हे प्रकल्प पुरेशा पावसाअभावी सध्या कोरडे होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जायकवाडीसह सर्व मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यावर परिणाम होईल. शिवाय शेतीपिकांवर परिणाम होईल, अशी स्थिती असल्याने मराठवाड्यातील जनतेची चिंता वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -