घरमहाराष्ट्रMaharashtra Weather : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला; मुंबईत पुढील 1-2 दिवस संमिश्र...

Maharashtra Weather : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला; मुंबईत पुढील 1-2 दिवस संमिश्र वातावरणाचा अंदाज

Subscribe

येत्या काही दिवशात अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्याचा पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला असून या वर्षा अखेरपर्यंत कायम राहू शकते.

मुंबई : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यात मुंबई आणि ठाण्यात थंडी वाढली आहे. रविवारी मुंबई उपनगराचे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस तर कलाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील एक ते दोन दिवस मुंबईत रात्रीच्या वेळी थंडी आणि दिवस उष्ण असे संमिश्र वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत 27 डिसेंबरपर्यंत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यानंतर थंडी वाढली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही पारा हा 9 अश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तर राज्याचे ‘मिनी काश्मीर’ महाबळेश्वरमध्ये रविवारी 15 अंशापर्यंत तापमान घसरले होते. मराठवाड्यातील औरंगबादमध्ये रविवारी सकाळी सर्वात कमी पारा होता. मराठवाडा आणि औरंगबादमध्ये 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्वरमध्ये जवळपास चार अंश सेल्सिअस आहे. पुण्यातही थंडीचा काडाका वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील पाषाण मध्ये 9.7 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Election 2024 : हे चित्र महाराष्ट्राला डोळे भरून पाहायचेच आहे, ठाकरे गटाच्या निशाण्यावर अजित पवार

वर्षा अखेरपर्यंत थंडी कायम

येत्या काही दिवशात अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्याचा पारा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला असून या वर्षा अखेरपर्यंत कायम राहू शकते. राज्यभरात थंडीचा जोर वाढल्याने ग्रामीन भागासह शहरात देखील लोक शेकोट्या पेटवून लागली आहेत. ही थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -