घरक्राइमUSA:अमेरिकेत कॅब चालकाने लावला भारतीय विद्यार्थिनीला चुना; वाचा-नेमकं काय घडलं?

USA:अमेरिकेत कॅब चालकाने लावला भारतीय विद्यार्थिनीला चुना; वाचा-नेमकं काय घडलं?

Subscribe

अमेरिकेतील एका भारतीय विद्यार्थिनीने दावा केला आहे की एक कॅब ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला, ज्यामुळे ती व्हिसा, बँक कार्ड आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशिवाय अमेरिकेत अडकली आहे.

नवी दिल्ली: अमेरिकेतील एका भारतीय विद्यार्थिनीने दावा केला आहे की एक कॅब ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला, ज्यामुळे ती व्हिसा, बँक कार्ड आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांशिवाय अमेरिकेत अडकली आहे. भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून भारतात परतत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. विद्यार्थ्यीनीने सोशल मीडियावर पोस्ट करून मदत मागितली आहे. (USA Cab driver limes Indian student in USA Read What exactly happened)

काय आहे प्रकरण?

भारतीय विद्यार्थिनी श्रेया वर्मा अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ डिझाइनमधून पदवी घेत आहे. नुकतीच ती भारतातील तिच्या पालकांना भेटण्यासाठी लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर रवाना झाली. श्रेयाने विमानतळावर जाण्यासाठी Lyft अॅपद्वारे कॅब बुक केली होती. दरम्यान, कॅब चालक श्रेयाचे सर्व सामान घेऊन फरार झाला.

- Advertisement -

यानंतर श्रेयाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती शेअर केली. भारतीय विद्यार्थिनीचा दावा आहे की तिचे 30 हजार डॉलर्सचे नुकसान झाले आहे आणि आता ती वैध कागदपत्रांशिवाय आणि पैशांशिवाय अमेरिकेत अडकली आहे. श्रेयाने लिहिले की, मी सतत LYFT च्या कस्टमर केअरची मदत घेत आहे पण दुर्दैवाने मला ड्रायव्हरशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळत नाही, ज्यामुळे समस्या वाढली आहे. मी अॅपद्वारे ड्रायव्हरशी संपर्क साधून माझे सामान लवकर परत करण्याचे आवाहन केले आहे. श्रेयाने लिहिले की, कंपनीकडून आवश्यक माहिती मिळाल्यानंतर ती याबाबत केंब्रिज पोलिसांकडे तक्रार करेल जेणेकरून कायदेशीर कारवाई करता येईल.

तिच्या पोस्टमध्ये, भारतीय विद्यार्थिनीने लिफ्ट कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याबद्दल तिची निराशा देखील व्यक्त केली आणि लिहिले की जर कंपनीने आवश्यक मदत दिली नाही तर तिला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल. लिफ्ट कंपनीचे सीईओ डेव्हिड रिशर यांनी श्रेयाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि तिची माफी मागितली. रिशरने लिहिले की ‘आमची टीम ड्रायव्हरला शोधण्यात व्यस्त आहे.’

- Advertisement -

(हेही वाचा: Snakes Smuggling : सापांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक, DRI ची कारवाई )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -