घरमहाराष्ट्र१४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी

१४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा नरबळी

Subscribe

चोपडा तालुक्यातील चहार्डी गावातील शिवाजी नगरातील मंगेश दगडू पाटील (वय 14) हा आठवीतील विद्यार्थी 2 फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. त्याचा सोमवती अमावस्येला नरबळी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ज्या दिवशी हा मुलगा बेपत्ता झाला त्याच दिवशी गावात आलेल्या 22 ते 25 वयोगटातील एका भिक्षुकावर खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. या भिक्षुकाबाबत काही माहिती असल्यास चोपडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलीस कसून चौकशी करत आहेत. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सावधानतेचा इशाराही पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisement -

मंगेश दगडू पाटील 2 फेब्रुवारीला आजोबा लोटन राघो पाटील यांना शौचास घेऊन जातो, असे सांगून घरून निघाला. मात्र, न परतल्याने वडील दगडू लोटन पाटील यांनी चोपडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. मंगळवारी खासगी हाळजवळ तुटलेल्या अवस्थेतील पाय आढळल्याने विद्यार्थ्याचा नरबळी दिल्याचा संशय वर्तवण्यात आला होता. भगवान न्हावी यांच्या शेतात पायाचा तुकडा तर कपडे, चप्पल, रक्त लागलेले दगड चंद्रकांत हरी पाटील यांच्या पडीक शेतात सापडले होते. तसेच त्यांच्या घराजवळही शरीराचे काही अवयव आढळल्याने या बालकाचा खून झाल्याचा दाट संशय आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर विळादेखील आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

भिक्षुकावर पोलिसांचा संशय                                                                                                     मंगेश पाटील या विद्यार्थ्याचा चहार्डी गावात आलेल्या एका भिक्षुकाने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. कुणी संशयित आढळल्यास चोपडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्याशी (8652565000) व (02586-220333) या क्रमांकांवर माहिती कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -