घरमुंबईखोटे बोलाल तर याद राखा

खोटे बोलाल तर याद राखा

Subscribe

अण्णा हजारेंचा सरकारला दम

मी आंदोलन जनतेच्या आणि शेतकर्‍यांच्या भल्यासाठी केले. तर आंदोलन संपावे म्हणून सरकारने पुढाकार घेतला. मात्र राज्य-केेंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर याद राखा, देशभर फिरून लोकांमध्ये सरकारचा खोटारडेपणा उघडा करून तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा स्पष्ट इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

लोकपाल व लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतमालाला दीडपट भाव मिळावा आदी मागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मंगळवारी सातव्या दिवशी मागे घेतले. यानंतर बुधवारी अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी सर्वत्र होत असलेल्या चर्चेबाबत छेडले. सरकारने तात्पुरता मार्ग काढून आश्वासन दिल्याच्या चर्चेची माहिती पत्रकारांनी अण्णांना दिली.

- Advertisement -

तेव्हा अण्णा म्हणाले; मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने विशिष्ट मुदत घेतली आहे. यात कोणी एक मंत्री नव्हते तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास सरकार किती आणि कसे खोटारडे आहे, हे मी देशभर फिरून सांगेन आणि याविरोधात जनतेच्या पाठिंब्याने मोठे आंदोलन उभे केले जाईल. उपोषण मागे घेतले म्हणून आंदोलन थांबलेले नाही. सरकारने मुदतीत आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर हे आंदोलन अधिकच चिघळेल, असेही अण्णा हजारे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -