घरमहाराष्ट्रसरकारनं आश्वासन न पाळल्याले मराठा विद्यार्थी आक्रमक; मंत्रालयातच ठिय्या आंदोलन

सरकारनं आश्वासन न पाळल्याले मराठा विद्यार्थी आक्रमक; मंत्रालयातच ठिय्या आंदोलन

Subscribe

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठी विद्यार्थ्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नाहीत, तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले होते. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलं. सारथीचे ८ उपकेंद्र, पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार, अण्णासाहेब पाटील महामंडळाला १०० कोटी निधी, २३ वसतीगृहांचं उद्घाटन होणार, हायकोर्टात कोपर्डी केस चालू करणार, पंजाबराव देशमुख वसतीगृह हे सारथीला हस्तांतरीत करणार, मराठा मोर्चामधील गुन्हे मागे घेऊ अशी आश्वासन दिली होती. मात्र, सरकारने दिलेलं आश्वासन अद्याप न पाळल्याने मराठा समाजेच विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाचा घात करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरलं असताना आता मतं मागत आहेत. मुख्यमंत्र्यांचे आदेश अधिकारी धुडकावत आहेत. जाणीवपूर्वक मराठा विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत. मुख्यमंत्री येत नाहीत तो पर्यंत इथून उठत नाहीत. एका आजीला भेटायला मुख्यमंत्री जाता, पण मराठा विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

संभाजीराजे यांचं उपोषण सोडायला लावलं, मागण्या मान्य केल्याचं सांगितलं पण आता एकही मागणी पूर्ण झालेली नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. १५ मार्चपर्यंत मागण्या पूर्ण करतो म्हणून सांगितलं, पण अजून एकही मागणी पूर्ण झाली नाही. ७ मागण्या पूर्ण करतो म्हणून आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. पण आता एकही मागणी पूर्ण केली नाही. संभाजीराजे तसंच आम्हा मराठा समाजाची फसवणूक केली आहे. भांगे नावाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्याची जबाबदारी घेतली होती. पण ते उडवाउडवीची उत्तर देत आहेत. त्यामुळे हे दालन सोडणार नाही असं, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -