घरमहाराष्ट्रमराठी भाषा, भूमी, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळेच मराठी भाषा प्रवाहित- एकनाथ शिंदे

मराठी भाषा, भूमी, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळेच मराठी भाषा प्रवाहित- एकनाथ शिंदे

Subscribe

मराठी भाषा, भूमी, संस्कृतीवर प्रेम करणारी मंडळी जगभर पसरली असून त्यांच्या माध्यमातून त्यांची जपवणूक होत आहे. जगभरात मराठी मंडळे उत्तम काम करत आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषा प्रवाहित, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

वसईः मराठी भाषा, साहित्य, संस्कृती परदेशात जपण्याचे काम जागतिक मराठी अकादमी करत आहे. जागतिक मराठी संमेलन मराठीचा जागतिक जागर करणारा उत्सव आहे. संमेलनांमुळे विचारांची देवाणघेवाण होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारमध्ये बोलताना केले. (Marathi language flows only because of people who love Marathi language land culture Eknath Shinde)

विरारच्या विवा कॉलेजमध्ये 19 वे जागतिक मराठी संमेलनाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषा, भूमी, संस्कृतीवर प्रेम करणारी मंडळी जगभर पसरली असून त्यांच्या माध्यमातून त्यांची जपवणूक होत आहे. जगभरात मराठी मंडळे उत्तम काम करत आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषा प्रवाहित राहिली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्र संत, कलाकार, साहित्यिकांची भूमी आहे. त्यांनीच मराठी भाषेला समृद्ध केले. जगभर पसरलेली मराठी भाषा आजही भक्कम उभी आहे. परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्ताने मराठी माणूस स्थिरावला आहे. मराठी माणसात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. मराठी माणूस कुठेही स्थिरावला तरी त्याचा जीव रांगड्या मातीत अडकलेला असतो, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

त्याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सकाळच्या सत्रात संमेलनात हजेरी लावली. मराठी माणसाने उद्योजक बनवण्याची मानसिकता ठेवावी. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करायला मी तयार आहे, असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात केले. जागतिक मराठी अकादमीने मराठी माणसाच्या प्रगतीची दिशा ठरवावी. नियोजन करावे. जपान, अमेरिका, चीन यादेशांच्या तोडीचे तंत्र आत्मसात करा. उद्योग उभारा. प्रगतीचे मार्ग माझ्या हातात आहेत. मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, असेही राणे यांनी सांगितले.

- Advertisement -

नोकरी देणारा मराठी तरुण तयार झाला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या देशातील विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या मुलाखतीद्वारे मार्गदर्शन करण्याच्या हेतूने जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली, असे अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी  सांगितले.

जपानचे आमदार तथा उद्योजक योगेंद्र पुराणिक यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खरे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संमेलनाचा स्वागताध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संमेलनाध्यक्ष योगेंद्र पुराणिक, आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, आमदार चिंतामण वनगा, रविंद्र फाटक यावेळी हजर होते.

डहाणूपर्यंत एमएमआरडीएचा विस्तार

वाढत्या शहरांच्या गरजा लक्षात घेऊन विकास प्रकल्प राबवण्याचे काम महायुती सरकारने हाती घेतले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीएचा विस्तार डहाणूपर्यंत करण्याचा विचार आहे.  आमदार हितेंद्र ठाकूर तुम्हाला जेवढे पैसे लागतील त्यात हात आखडता घेणार नाही. विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात दिली.

दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी

सत्तांतर झाल्यानंतर रामदास फुटाणे यांनी दाढीवर केलेल्या कवितेची आठवण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटे काढले. माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या आहेत. दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते. पण, मी कुणाचाही घात करत नाही. मी शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकीय हेवेदावे असतात. ते तेवढ्यापुरतेच असले पाहिजेत. पण, सध्या अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे. त्यावर एखादी कविता करा, असं मिश्किलपणे मुख्यमंत्री शिंदे रामदास फुटाणेंना म्हणाले. 

ते करायला धाडस, हिंमत, जिगर लागते

50 आमदार, 13 खासदारांसह लाखो शिवसैनिकांना विश्वासाने सोबत घेऊन दीड वर्षांपूर्वी मी मोठे काम करुन ठेवले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत सगळ्यांना जपण्याचे काम करत आहेत. त्यासाठी धाडस, हिंमत, जिगर लागते, असे टोलेबाजीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

पालघर साधू हत्यांकाडातील वारसांना पाच लाखांची मदत

जागतिक मराठी संमेलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. घऱ तिथे शिवसेना आणि गाव तिथे शिवसेना अशी घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आवाहन यावेळी केले. तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधूंची हत्या करण्यात आली होती. यामेळाव्यात साधूंच्या कुटुंबियांचा सन्मान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी साधूंच्या कुटुंबियांची भेट नाकारली होती. पण, आमची खरी शिवसेना असल्याने आम्ही साधूसंतांचा सन्मान करतो, असा टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे यांनी साधूंच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदतही जाहिर केली. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -