घरमहाराष्ट्रपुणेAyodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण...;...

Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण…; शरद पवारांचे मोठे भाष्य

Subscribe

पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील हजारो हिंदूंना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वच राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अद्यापही निमंत्रण मिळालेले नाही. अशातच शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, राम मंदिराचे निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीला न जाता, नंतर कधीतरी जाईल. (Ayodhya Ram Mandir I will definitely go to Ayodhya even if I have not received an invitation Sharad Pawar big comment)

हेही वाचा – कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावून गद्दारीचा कचरा साफ करूया; Sanjay Raut यांचे टीकास्त्र

- Advertisement -

शरद पवार आज पुण्यातील जुन्नर येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. पण काही हरकत नाही, त्याठिकाणी मी नक्की जाणार आहे. मात्र 22 जानेवारीला न जाता, नंतर नक्की जाईल. कारण श्रीराम हे सर्वांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.

अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ

शरद पवार म्हणाले की, अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात प्रचंड वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आले आहेत. विमानसेवा महागल्यामुळे जर कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. मात्र राम मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray सहकाऱ्यांना घरगडी समजतात, त्यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी; Eknath Shinde यांचे प्रत्युत्तर

पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, घराणेशाही आहे, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा सवाल करत शरद पवार म्हणाले की, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असा सल्ला शरद पवार यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -