घरमहाराष्ट्रRaigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

Raigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

Subscribe

मध्य रेल्वे माथेरानला पॉड हॉटेल बांधणार आहे. गेल्या वर्षभरात तब्बल पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी माथेरानची सफर केली आहे. या पर्यटकांनी मिनिट्रेनने माथेरानचा प्रवास केल्यामुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत साडेतीन कोटी रुपयांची भर पडली. म्हणूनच आता पॉड हॉटेल बांधून पर्यटकांना आकर्षित करण्याची आणखी एक योजना मध्य रेल्वेने आखली आहे. थोडक्यात पर्यटकांना थंडाव्याची अन् रेल्वेला उत्पन्नाची भुरळ पडली आहे.

दिनेश सुतार : आपलं महानगर वृत्तसेवा

माथेरान : रायगड जिल्ह्यातील माथेरान हे हिलस्टेशन महाराष्ट्रासह देशात पर्य़टकांच्या आवडीचे ठिकाण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी माथेरानचा थंडावा अनुभवला आहे. विशेष म्हणजे माथेरानला येण्यासाठी पर्यटक मिनिट्रेनला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वर्षभरात ५ लाख प्रवाशांनी मिनिट्रेनने प्रवास करून रेल्वेच्या तिजोरीतही तब्बल ३ कोटी ५४ लाखांची भर टाकली आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानला अत्याधुनिक पॉड हॉटेल बांधण्याची तयारी केली आहे. म्हणजेच भविष्यात मध्य रेल्वे मिनिट्रेन आणि पॉड हॉटेलच्या माध्यमातून माथेरानच्या पर्यटन उत्पन्नातून मोठी कमाई करणार आहे. (Matheran Tourism)

हेही वाचा… Raigad Murud Fishermen angry : महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाविरोधात मुरुडच्या मच्छीमारांनी थोपटले दंड

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या संपून सुट्ट्या लागल्या आहेत. त्यातच राज्यातील विशेष करून रायगड, कोकणातील पारा चढला आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाण्याकडे पर्यटकांचा कल आहे. मुंबई, पुणे आणि नजिकचे पर्यटक हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानला प्राधान्य देतात. शिवाय माथेरानची मिनिट्रेन आकर्षण असल्यामुळे सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांचे माथेरानच्या दिशेने पाऊल न पडल्यास नवल! (Central Railway to build pod hotel at Matherran)

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

- Advertisement -

माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे पहिले प्राधान्य असते ते मिनिट्रेनला! त्यानंतर टॅक्सीचा पर्याय खुला असतो. शिवाय खासगी वाहनांनीही पर्यटक येतात. माथेरानची ट्रेन ११७ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली असून भारतातील काही ऐतिहासिक डोंगराळ रेल्वे सेवांपैकी ही एक आहे. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करण्याची पर्यटकांची उत्सुकता असते. सध्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान दररोज ४ सेवा आहेत. तर अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यान १६ सेवा सुरू आहेत. १६ पैकी १२ सेवा रोज सुरू असतात तर ४ विशेष फेऱ्या वीकेण्डला म्हणजे शनिवार आणि रविवारी असतात. (Mini Train added revenue)

रेल्वेचे पॉड हॉटेल

माथेरानमध्ये ३८ पर्यटनस्थळे आहेत. एको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईझा पॉईंट ही काही महत्त्वाची स्थळे आहेत. समुद्रसपाटीपासून २६०० उंचीवर आणि ५६ किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले माथेरान पर्यटकांना कायम आकर्षित करते. त्यातून मिळणारे उत्पन्न पाहून आता मध्य रेल्वेने माथेरानला पॉड हॉटेल बांधण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यामध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असतील.

या पॉड हॉटेलच्या विकासाचे आणि कामकाजाचे कंत्राट ई-टेंडरने दिले आहे. हे पॉड हॉटेल सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. त्यामुळे मिनिट्रेन तसेच प़ॉड हॉटेलमधून मध्य रेल्वेच्या तिजोरीत भविष्यात मोठी भर पडू शकेल. (Matheran Hill Station)

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -