घरमहाराष्ट्रनाशिकराजकीय घडामोडींमुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

राजकीय घडामोडींमुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मिम्सचा महापुर आला असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधी संपन्न होताच ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या….

  • एक सामान्य मतदार आणि नागरिक म्हणून निवडणूक आयोगाकडे नम्र विनंती आहे की, इथून पुढे, मतदानानंतर आमच्या बोटांना शाई लावण्याऐवजी चुना लावावा
  • सगळ्यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे घेऊन किरीट सोमय्या नदीकडे रवाना..
    सगळ्या कागदपत्राची होडी करून नदीत सोडून देतो म्हणाले, सूत्रांची माहिती
  • शिवसेना + भाजप बघून झाले
    राष्ट्रवादी+ काँग्रेस बघून झाले
    भाजप + राष्ट्रवादी बघून झाले
    शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस बघून झाले
    शिवसेना (शिंदे) + भाजप पण बघून झाले
    शिवसेना(शिंदे) + भाजप + राष्ट्रवादी
    (अजित पवार) आता
    आता फक्त भाजप + काँग्रेस
    पाहिले की आम्ही मतदार चारधाम
    यात्रा करायला मोकळे
  • किरीट सोमय्या बुरखा पांघरून फिरत आहेत, तोंड दाखवाला आणी उघडायला जागाच नाही
  • थोड्या दिवसांत महाशक्ती किरीटचा पापलेट करून समुद्रात सोडेल
  • पहाटेचा दीड दिवस टिकला, दुपारचा किती दिवस टिकेल हे माहीत नाही.
  • अजित पवारांची हॅट्रिक : एका पंचवार्षिकमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री
  • अजित पवार पहाटे पण झोप मोडतात आणि दुपारी पण झोप मोडतात… – एक पुणेकर
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांची तक्रार आणि नाराजी…. आम्हाला थेट राजभवनात नेले? डोंगार, झाडी, हाटेल आणि गुवाहाटी काय बी नाय दाखवलं!
  • खरा घात तर मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप आणी शिंदे गटातील आमदारांचा झाला
  • शिंदे आणि फडवणीस साहेब बोलत होते हे गतिमान सरकार आहे
    आता आजित पवार आल्यावर कोणत नाव पडेल या सरकारला
  • आता मोदी साहेबांनी राहुल गांधी यांनासुद्धा उपपंतप्रधान करून टाकावे जेणेकरून निवडणुकीचा खर्च तरी टाळता येईल
  • जनतेला पडलेला प्रश्न
    च्यायला पहाटे ५ वाजता व रविवारी साधा तलाठी तात्या भेटत नाही, पण राज्यपाल बरा भेटतो यांना.
  • अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, अजित पवार शिवसेना फोडत आहेत म्हणून आम्ही भाजप सोबत गेलो म्हणणार्‍या शिंदे गट आता कसं वाटत असेल
  • आता आम्हालाही भाजपचा प्रचार करावा लागेल, याचा आम्हाला आनंद आहे की दुःख हेच समजेनास झालंय…
  • राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्री झाले, शिंदे गटाचे भाजप आमदार गेले जंगली रमी खेळायला
  • अजून एक काँग्रेसचा उपमुख्यमंत्री करा म्हणजे तीन शिफ्टमध्ये काम करतील- एक एमआयडीसी कार्यकर्ता
  • मी काय म्हणतो आता यांना पण खोके मिळाले असतील का?
  • आख्खा पक्षच देवेंद्रवासी झाला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -