घरमहाराष्ट्रतक्रारदार महिलाच झाली #MeTooची शिकार

तक्रारदार महिलाच झाली #MeTooची शिकार

Subscribe

पिंपरी - चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकांनेच केला तक्रारदार महिलेचा विनयभंग

पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पोलीस उपनिरक्षिकांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनाथ पालवे या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी तडकाफडकी निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमके काय घडले?

पिंपरी – चिंचवड येथे एक ३५ वर्षीय महिला आपल्या पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गेली होती. त्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक रामनाथ पालवे यांच्याकडे जाऊन आपली तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान पालवे यांने महिलेला काळजी करु नका. तुम्ही घाबरु नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तिचा विनयभंग केला. तसेच पोलीस उपनिरीक्षकांनी महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन करुन आईला फोन दे असे सांगितले. त्या महिलेने फोन घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रामनाथ पालवे यांनी या महिलेला थेट ‘आय लव्ह यू’ असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी या महिलेने रामनाथ पालवे या पोलीस उपनिरीक्षका विरोधात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात १० ऑक्टोबरला चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वाचा – हिंजवडी पोलीस हद्दीत संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -