घरमहाराष्ट्रराधाकृष्ण विखे पाटील यांच्या एक्झिटनंतर बाळासाहेब थोरातांचे प्रमोशन

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एक्झिटनंतर बाळासाहेब थोरातांचे प्रमोशन

Subscribe

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने विधिमंडळ नेतेपदी प्रमोशन दिले आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर नसीम खान यांना विधानसभेचे उपनेते म्हणून निवडण्यात आले आहे.

१७ जून पासून विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक लागणार आहे. शेवटच्या अधिवेशनातच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याजागी आता त्यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांना उभे करून काँग्रेसनेही विखे यांना योग्य तो संदेश दिल्याचे यातून दिसत आहे.

- Advertisement -

विधिमंडळ पक्षनेतेपदासोबतच पक्षाच्या प्रतोदपदातही फेरबदल करण्यात आले आहेत. बसवराज पाटील यांना मुख्य प्रतोद करण्यात आले आहे. के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे, उपनेतेपदी रामहरी रुपनवर आणि भाई जगताप यांना प्रतोदपदी निवडण्यात आले आहे.

Congress party circular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -