घरताज्या घडामोडीMLC Election: राज्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी आज मतदान, भाजप-मविआत रस्सीखेच सुरु

MLC Election: राज्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी आज मतदान, भाजप-मविआत रस्सीखेच सुरु

Subscribe

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या २ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अकोला वाशिम बुलढाणा आणि नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर केली होती. महाविकास आघाडी आणि भाजपच्या चर्चेतून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अकोल्यात शिवसेना विरुद्ध भाजप तर नागपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये लढत होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून रस्सीखेच सुरु झाली आहे. काँग्रेसनं मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आपला उमेदवार बदलून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

राज्यात एकूण ५ मतदारसंघातील ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी मुंबईतील २ जागांवर भाजप आणि शिवसेनेचा उमदेवार बिनविरोध निवडून आला आहे. तर कोल्हापूर आणि धुळ्यातही बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात चुरशीची निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून भाजपचा नगरसेवक फोडून रविंद्र भोयर यांना तिकीट दिलं होते परंतु ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. नागपूरमध्ये भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे पारडे जड मानलं जात आहे. यामुळे या जागेवरील निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

अकोला बुलडाणा वाशिमध्ये भाजप शिवसेनेत रस्सीखेच

शिवसेनेच्या मुंबईतील विधानपरिषदेच्या जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडला आहे. परंतु अकोल्यातील जागेवर शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपकडून वसंत खंडेलवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाजोरिया यांचे मागील २ टर्म पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व राहिले आहे. यामुळे शिवसेना इथे बाजी मारण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विधानपरिषदेच्या २ जागांवर आज मतदान प्रक्रिया होणार आहे. तर १४ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होणार असून त्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हिंगोलीमधील विधानपरिषदेच्या जागावेर काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध कऱण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यातील २ जागांवर आज निवडणूक होत आहे. या जागांवरील निवडणुकीमध्ये शिवसेना- भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


हेही वाचा : नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला, भोयरऐवजी देशमुखांना पाठिंबा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -