घरमहाराष्ट्रMMRDA: भिवंडीच्या गोदामांचा विस्तार मुरबाडपर्यंत होण्याची शक्यता

MMRDA: भिवंडीच्या गोदामांचा विस्तार मुरबाडपर्यंत होण्याची शक्यता

Subscribe

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीकरण आता मुरबाडपर्यंत करण्याचे काम सुरू झाले आहे. या लॉजेस्टिक पार्कसाठी आरक्षित क्षेत्र निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी भिवंडी, पडघा, उरण आणि पनवेलपर्यंत मर्यादित असलेल्या गोदामांचा विस्तार होता. पण आता आता गोदामाचा विस्तार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, रायगड आणि मुरबाड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यापर्यंत करण्याचे नियोजन आहे.

तसेच भिवंडी, पनवेल, पडघा आणि उरणपर्यंत मर्यादित असलेल्या गोदामांचा विस्तार शहापूरपासून ते मुरबाडपर्यंत करण्यात येणार आहे. या भागात हिरव्या वनराईने बहरलेला असून त्यामुळे येथे कमीत कमी क्षेत्राचा वापर करून गोदामाला मान्यता देण्यात येईल, असे नियोजन महानगर विकास प्राधिकरणाकडून सुरू असल्याची माहिती माध्यमातून मिळते.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी टोलची याचिका मागे घेतली नाही; राज ठाकरेंच्या आरोपावर याचिकाकर्त्याचे प्रत्युत्तर

गेल्या काही वर्षापासून भिवंडी,उरण, पडघा आणि पनवेल या पट्ट्यात गोदामांचे मोठे क्षेत्र विकसित झाले आहे. यामुळे लाखोंचा रोजगार निर्माण करणाऱ्या या केंद्रांमध्ये अत्यावश्यक रस्ते आणि इतर नागरी सुविधा नाहीत. कोणत्याही नियोजनाशिवाय हे व्यापार केंद्र सुरू आहेत आणि ता हीच व्यापार केंद्र मोठ्या कोंडीची ठिकाणे झाली आहेत. यामुळे भिवंडी, उरण, पनवेल आणि पडघा भागातील शहरांना यांचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर कोंडी फोडण्यासाठी व्यापार दळणवळण केंद्रांचा विस्तार नियोजन केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुरबाडपर्यंत वाढल्यास या भागाचा नियोजनबद्ध विकास शक्य आहे. यामुळे हा भाग विकासाच्या टप्प्यात होणार असून सर्व परिसराचा देखील सर्वांगीण विकास होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -