घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी परवानगी नसतानाही मनसैनिकांनी छापल्या निमंत्रण पत्रिका

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी परवानगी नसतानाही मनसैनिकांनी छापल्या निमंत्रण पत्रिका

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. राज्यात भोंग्यावरून राजकीय रान पेटलं असून त्या पार्श्वभूमीवर ते सभा घेणार आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाहीये. सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे पदाधिकारी मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत. अशातच राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी मनसैनिकांनी खास निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत.

या सभेसाठी औरंगाबादमध्ये घरोघरी जाऊन मनसे कार्यकर्ते निमंत्रण पत्रिका वाटणार आहेत. एकीकडे सभा स्थानावरून घमासान होत असताना दुसरीकडे मनसैनिक मात्र पूर्णपणे तयारीसह सज्ज आहेत. सभेनिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या असून ते घरोघरी वाटणार असल्याचं सांगितलं जातंय. या पत्रिकेवर भगव्या शालीत लपटलेले राज ठाकरे दिसत असून पत्रिकेवर हिंदुत्वाची पताका दिसतेय. भगव्या झेंड्यावर हनुमानाचा फोटो दिसत आहे. ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा, असं लिहिण्यात आलंय.

- Advertisement -

मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाहीये. मात्र औरंगाबाद पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवला आहे. राज ठाकरेंची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यास आग्रही आहे.

मनसे नेते प्रकाश महाजनांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी द्या अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा मनसे नेते प्रकाश महाजनांनी दिला आहे. तसेच आज आम्ही आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागत आहोत. आज भेट घेतल्यानंतर आयुक्त जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतील, असं प्रकाश महाजन म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यात महत्त्वाची बैठक, मोदींनी केलं स्वागत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -