घरमहाराष्ट्ररिअल लाईफ मधील ३०० मर्दानींनी पाहिला 'मर्दानी २'

रिअल लाईफ मधील ३०० मर्दानींनी पाहिला ‘मर्दानी २’

Subscribe

पिंपरी चिंचवड शहरातील ३०० पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी राणी मुखर्जीचा मुख्य भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट पाहिला. या चित्रपाटाचे आयोजन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ‘महाराष्ट्रासह अवघ्या देशात पोलीस कर्मचारी अधिकारी हे दिवस रात्र कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनात विरंगुळा व्हायला पाहिजे तसेच त्यांचं मनोबल वाढवे अशा उद्देशाने मर्दानी दोन या हिंदी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते’, अशी माहिती पोलीस अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली आहे. यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३०० पेक्षा जास्त महिला पोलिसांनी सहभाग नोंदवला होता.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांचे महिला कर्मचाऱ्यांनी मानले आभार

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘मर्दानी २’ या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीने एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सर्व चित्रपट गुन्हेगारी आणि होणारा तपास यावर आधारित असून यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्याचे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांगितले. आज गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा चित्रपट आकुर्डी येथील चित्रपट गृहात दाखवण्यात आला. ‘महिला पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेकदा मर्दानी रूप धारण करावं लागतं. त्यांचा कामाचा ताण तणाव कमी व्हावा यासाठी महिलांना मर्दानी चित्रपट दाखविला. त्याबद्दल पोलीस आयुक्तांचे महिला कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत. सोबतच मर्दानी चित्रपट बघून आमच्यात पुन्हा एक नवीन उत्साह निर्माण झाला’, असे देखील काही महिला पोलीस म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -