घरताज्या घडामोडीधक्कादायक! साताऱ्यात मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण, मुलीला नेलं फरफटत

धक्कादायक! साताऱ्यात मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण, मुलीला नेलं फरफटत

Subscribe

साताऱ्यात फलटणमधील कुरवली खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघींचे कपडे फाटले असून त्यांना फरफटत नेल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरवली खुर्द येथे रविवारी सायंकाळी मायलेकीला मारहाण करण्यात आली. यावेळी दोघींना फरफटत नेण्यात आलं आणि यामध्ये त्यांचे कपडेही फाटले होते. संबंधित महिला विधवा असून तिची मुलगी 16 वर्षांची आहे. या घटनेनंतर मायलेकींची तक्रारही पोलिसात घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, सकाळच्या वेळेस फलटण पोलिसांनी पीडित महिलेसह मुलीला पोलीस ठाण्यात आणले आणि पोक्सो, अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेमका वाद काय?

शाळकरी मुलांमध्ये क्रिकेटच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्या वादाचं रुपांतर मारहाणीपर्यंत पोहोचलं. पोलिसांनीही मुलांमधील वादाचे पर्यावसन महिलांच्या भांडणात झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मणिपूर येथे महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरावरून मणिपूर सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. मणिपूर सरकार बरखास्त करा अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र ही घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमध्ये 2 महिलांना नग्न करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण केली. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा : प. बंगालमध्ये मणिपूर घटनेची पुनरावृत्ती, दोन महिलांना नग्न करून मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -