घरमहाराष्ट्रपुणेMumbai-Pune Expressway : साडेपाच तासांनंतर वाहतूक सुरळीत; टॅंकर आगीमुळे झाली होती कोंडी

Mumbai-Pune Expressway : साडेपाच तासांनंतर वाहतूक सुरळीत; टॅंकर आगीमुळे झाली होती कोंडी

Subscribe

 

मुंबईः Mumbai-Pune Expressway वरील अपघातामुळे येथील ठप्प झालेली वाहतूक तब्बल साडेपाच तासांनंतर सुरळीत झाली. मुंबईच्या दिशेने जाणारा केमिकलचा टॅंकर मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास या मार्गावर पलटी झाला. त्यांनतर टॅंकरला आग लागली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत चार जणांचा बळी गेला.

- Advertisement -

या अपघातानंतर Mumbai-Pune Expressway वरील वाहतूक ठप्प झाली होती. सुरुवातीला वाहतूक सुरु करण्यात आली होती. नंतर मार्ग बंद करण्यात आला. काही वेळाने वाहतूक हळूहळू सुरु करण्यात आली. सध्या या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरु आहे.

Mumbai-Pune Expressway वरील खंडाळा घाटात दुपारच्या वेळेत ऑइल टँकरला अचनाक आग लागली. भररस्त्यात आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. टँकरमध्ये मिथेन मिश्रीत अल्कोहोल असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचाःJuhu Sea Face : जुहू समुद्रात बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले; सख्या भावांच्या निधनामुळे हळहळ

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या या ऑइल टँकरला आग लागल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ऑइल पसरले. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना ही घटना घडली. तर ब्रीजच्या खाली असणाऱ्या गाड्या पण या आगीच्या भक्षस्थानी आल्या होत्या. तर या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या घटनेत काही व्यक्ती जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ज्या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे, त्यातील एक महिला असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर चार ते पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

भोपाळमध्ये हवाई दलाने विझवली सरकारी इमारतीची आग

भोपाळ येथील सातपुडा या सरकारी इमारतीला सोमवारी भीषण आग लागली होती. स्थानिक अग्निशमन दल ही आग विझवण्यात अपयशी ठरले होते. आग विझवण्यासाठी लष्कराला बोलवण्यात आले होते. तरीही आग आटोक्यात न आल्याने आता हवाई दलाची मदत घेतली गेली. हवाई दलाने अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण आणले.

सातपुडा भवनाच्या तिसच्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली होती. एसीमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आगी हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरली. इमारत खाली करण्यात आली आहे. आगीत महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे लष्कराला आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले. आगीने रौद्ररुप धारण केल्याने लष्करालाही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संरक्षण मंत्रालयाशी संपर्क करुन हवाई दलाची मदत मागितली आहे. त्यानुसार रात्री हवाई दल घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करुन हवाई दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -