घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची...

Maharashtra Assembly Winter Session 2021: महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले

Subscribe

ज्या पद्धतीचे आक्षेप जे राज्यपालांनी केले होते. त्याबाबतचं स्पष्टीकरण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये विधानसभेचे कामकाज आणि विधिमंडळाचे नियम बदल आणि जे घटनात्मक अधिकार विधिमंडळाला आहेत. त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. जे मुद्दे राज्यपालांनी मांडलेले होते. ते सगळे फोडून सरकारने राज्यपालांना विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाली पाहीजे. त्यासाठी पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपाची भूमिका आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले म्हणाले की,अद्यापही राज्यपालांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाहीये. पत्र किंवा प्रतिसाद आल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असं पटोले म्हणाले. संविधानिक पद्धतीने जी कारवाई करता येते त्या पद्धतीने ही कारवाई होईल. राज्यपालांकडून प्रतिसाद आल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

या अधिवेशनात अध्यक्षाची निवड होणार का ?

काँग्रेस आणि महाविकास आघाडीचाही तोच प्रयत्न आहे. त्या पद्धतीची आम्ही पूर्ण तयारी लावलेली आहे. काल राज्यपालांना आमच्या नेत्यांनी भेट दिली होती. त्यांना सर्व भूमिका समजावली आहे. अँड. जनरलला बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी तपासून या पद्धतीची कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका

नियम शिथिल करण्याचे अधिकार हे राज्यपालांना असतात. त्यासंबंधीची पूर्ण कारवाई करण्यात आली आहे. जे काही नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात. त्याच नियमाप्रमाणे ही सर्व कार्यवाही झालेली आहे. हे नियम घटनाबाह्य नाहीत तर घटनेच्या आधीन राहूनच ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये भाजपा राजकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपाची भूमिका आहे, हे यामधून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

राज्यपालांनी कोणते आक्षेप घेतले

विधानमंडळामध्ये ज्या नियमावलीत आम्ही बदल केले होते. ते नियम घटनाबाह्य आहे. अशा पद्धतीचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. ते कसे बरोबर आहेत. त्यांचं विश्लेषण आम्ही त्यांच्यासमोर मांडलेलं आहे, असं पटोले म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिलं होतं. मात्र, राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं सांगितलं आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: प्रभाग रचनेमध्ये सरकारच्या वतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -