घरमहाराष्ट्रनाशिकआचारसंहितेमुळे जनावरे पकडण्याचा ठेकाच ‘मोकाट’

आचारसंहितेमुळे जनावरे पकडण्याचा ठेकाच ‘मोकाट’

Subscribe

जनावरे पकडण्याचा ठेका आचारसंहितेच्या गर्तेत अडकल्यामुळे सद्यस्थितीत हा ठेका ‘मोकाट’ असल्याचे चित्र आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

जनावरे पकडण्याचा ठेका आचारसंहितेच्या गर्तेत अडकल्यामुळे सद्यस्थितीत हा ठेका ‘मोकाट’ असल्याचे चित्र आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वीच गाय आडवी आल्याने बसच उलटल्याची घटना घडली होती. याशिवाय दुचाकीचालकांना शिंग मारणे, त्यांच्या पाठीमागे लागणे असे प्रकारही आता वाढले आहेत.

शहरासह परिसरातील मोकाट जनावरे पकडून ते महापालिकेच्या जुने नाशिक व सातपूर येथील कोंडवाड्यात दहा दिवसांसाठी ठेवले जातात. या कालावधीत संबंधित जनावरांचा मालक आला तर ठीक नाही तर अशा जनावरांना संगमनेर येथे गो-शाळेत पाठविले जाते. परंतु, गेल्या एक वर्षापासून महापालिकेचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने निविदा मागविल्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वर्षभरापासून मोकाट जनावरांकडे महापालिकेचे लक्षच नाही. दोन वर्षांपासून जनावरे पकडण्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने या कालावधीत सुमारे ६०० जनावरे पकडले. जनावरे पकडण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहन, दहा दिवस जनावरे सांभाळण्याचा खर्च असा एकूण सुमारे ८०० रुपये प्रतिजनावरे खर्च महापालिकेमार्फत ठेकेदाराला दिला जातो. मात्र, हा खर्च न मिळाल्याने ठेकेदाराने जनावरे पकडण्याचे काम बंद केले. त्यानंतर महापालिकेने जनावरे पकडण्याच्या ठेक्याच्या निविदा मागविल्या. परंतु जाचक अटींमुळे त्यास प्रतिसादच मिळाला नाही.

- Advertisement -

अल्प मुदतीच्या निविदेला पाच मक्तेदारांनी प्रतिसाद दिला आहे. या निविदेचे तांत्रिक बिड पूर्ण झाले असून आता निविदा प्रक्रीया अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र, आचारसंहितेमुळे ही प्रक्रियादेखील थांबली आहे. महत्वाचे म्हणजे या काळात शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून अपघाताच्या घटना वारंवार होत आहे. काही महिन्यांपूर्वी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे अशाच प्रकारे एका महिलेच्या पोटात मोकाट जनावराचे शिंग घुसून महिला गंभीर जखमी झाली होती. सिडकोत भल्या सकाळी एका शाळकरी मुलाला मोकाट गायी-बैलांनी अक्षरश: तुडवले होतेे. मोठ्या जिकिरीने या मुलाचे प्राण वाचले. त्यानंतर मोकाट गाईच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वीच पंचवटीतील मायको हॉस्पिटलसमोर मोकाट गाय आडवी केल्याने एसटी महामंडळाची बस उलटली होती. बसचा वेग कमी असल्याने दुर्घटना टळली होती. मात्र या निमित्ताने मोकाट जनावरे पकडण्याच्या ठेक्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आचारसंहितेनंतर तातडीने काम दिले जाणार

मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा प्रसिध्द केल्या आहेत. आचारसंहितेनंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने काम देण्यात येईल. – डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -