घरमहाराष्ट्रनाशिकसिटीलिंक बससेवेचाही प्रवास महागला

सिटीलिंक बससेवेचाही प्रवास महागला

Subscribe

नाशिक : नाशिक महापालिकेने सुरू केलेली सिटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावत असून, हा तोटा भरून काढण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. तूट कमी करण्यासाठी सिटी लिंकच्यावतीने शहर बस सेवेत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन भाडेवाढ १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पासून लागू करण्यात येणार आहे.

सध्या नाशिक शहरात सिटीलिंकच्या एकूण २३० बसेस असून, त्यातील १८५ बसेस सीएनजीवर धावतात. उर्वरित डिझेल बसेस आहेत. वाढणारे इंधन दर लक्षात घेता, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता हि भाडेवाढ करण्यात आली आहे. आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ उशिराने १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिटीलिंकच्यावतीने करण्यात आले आहे. वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आल्याचे सिटीलिंकच्यावतीने कळविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -