घरमहाराष्ट्रनाशिकउद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवा ; अन्यथा..

उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवा ; अन्यथा..

Subscribe

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नवीन नाशिक : कचरा टाकणारे, साहित्यांची चोरी करणारे यासह मद्यपी व टवाळखोरांवर कारवाई करता यावी; महापालिकेच्या मालमत्तेचे, नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकवर स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसरातील अनेक उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक हे टवाळखोर आणि मद्यपींचे अड्डे झाले आहेत. तेथे झाडपाला व इतर कचरा टाकला जातो, यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. महिला-पुरुषांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटनाही घडतात. संरक्षक जाळ्या, ग्रीन जिमचे साहित्य यांचीही चोरी होते. या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा, संबंधितांवर कारवाई करता यावी, नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निवेदन शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या वतीीने देण्यात आले.

- Advertisement -

शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे आदी उपस्थित होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -