घरमहाराष्ट्रनाशिककेळझर धरण ओव्हर फ्लो तर पुणेगावही ९२ टक्के भरले; विसर्ग सुरू

केळझर धरण ओव्हर फ्लो तर पुणेगावही ९२ टक्के भरले; विसर्ग सुरू

Subscribe

नाशिक : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण रविवारी (दि. ६) पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा आरम नदीपाञात विसर्ग होत आहे. तर दिंडोरी तालुक्याच्याही पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही तर पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर वाढला असून हळूहळू धरणसाठ्यात वाढ होत आहे. पुणेगाव धरण मांजरपाडा प्रकल्पामुळे ९२% इतके भरले आहे.

बागलाणच्या पश्चिमपट्याबरोबर सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण आज ओव्हर फ्लो झाले. धरण क्षेत्रात गेल्या ३ दिवसांत झालेल्या सततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होवून धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. ५७२ दलघफू पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या केळझर धरणाच्या सांडव्यावरून सद्यस्थितीत पाणी आरम नदीपाञात विसर्ग होवून नदी दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नदीपात्रात लगत असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले जात आहे. या पुरपाण्यामुळे सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

- Advertisement -

मांजरपाडा प्रकल्पामुळे पुणेगांव धरण ९२ टक्क्यावर 

मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगाव धरणात साठवण होत असल्याने ९२% इतके धरण रविवारी (दि. ६) भरले असून लवकरच पुणेगाव धरणात क्षमतेइतका जलसाठा जमा होणार आहे. पुणेगाव धरण भरल्यानंतर या धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर हे पाणी ओझरखेड धरणात जाते. त्यामुळे आजमितीस ओझरखेड धरणात मात्र 29% इतका जलसाठा
आहे. त्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

इतर धरणांची काय स्थिती ? 

करंजवण 50%, पालखेड 68%, वाघाड 61% तर तिसगाव 0% अशी स्थिती आजमितीस आहे. दिंडोरी तालुक्याबरोबर येवला, मनमाड, चांदवड, निफाड येथील नागरिक व शेतकरी यांना जलसाठ्यात वाढ होत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण पाणीपुरवठा योजना व कॅनॉलद्वारे शेतीसाठी जाणारे पाणी यांचा हा स्त्रोत असल्याने त्या भागातील पाण्याची समस्या सुटणार असे वर्तमान चित्र आहे.

- Advertisement -

पाणीप्रश्न निकाली

मांजरपाडा-देवसाने प्रकल्पामुळे पाच तालुक्यांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण असा परिचय असलेल्या करंजवण धरणातून दिंडोरी, मनमाड, येवला, निफाड या चार तालुक्यांसाठी ही बाब सकारात्मक आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी अशा समीकरण पूर्तीला ही बाब सहाय्यभूत ठरणार आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ननाशी कोशिंबे याबरोबर ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. हे पावसाचे पाणी वेगाने प्रवाहित होत आहे. तालुक्यातील करंजवण, पुणेगाव, ओझरखेड, वाघाड या धरणांतील पाणी धरणे भरल्यानंतर पालखेड धरणात या पाण्याचा विसर्ग करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही धरणे पश्चिम पट्ट्यातील पावसाचा जोर कायम राहीला तर लवकर भरतील. दरम्यान वणी पिंपळगाव रस्त्यावरील खेडगाव परिसरात तिसगाव धरणात अद्यापही 0% जलसाठा आहे.ही चिंतेची बाब शेतकरी व पाणीपुरवठा संस्था यांचेसाठी आहे. धरणाचे आकारमान कमी असले तरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा पूर्व भागात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -