घरक्राइमनाशिक शहर पोलीस दलात मोठी खांदेपालट; कोणाकडे कोणती जबाबदारी?

नाशिक शहर पोलीस दलात मोठी खांदेपालट; कोणाकडे कोणती जबाबदारी?

Subscribe

नाशिक : राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये शहरातीलही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहरास नव्याने पोलीस अधिकारी मिळाले असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाणे, शाखांची धुरा देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहरातील पोलिस ठाण्यांमधील व इतर शाखांमधील प्रभारी अधिकारी बदलले असून, येत्या काही दिवसांत आणखीन नवीन अधिकार्‍यांचा समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडेही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

राज्यातील बदल्यांनुसार नाशिक पोलीस आयुक्तालयात १४ पोलीस निरीक्षक हजर झाले आहेत. त्यापैकी आठ निरीक्षकांनी नियंत्रण कक्षात हजर होत पदभार स्वीकारला. आस्थापना मंडळाच्या आदेशानुसार आगामी निवडणुका, सण उत्सव लक्षात घेत पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व इतर शाखांमधील प्रभारी अधिकार्‍यांची बदली केली आहे.

- Advertisement -

पोलीस ठाणेनिहाय पोलीस निरीक्षक

गजेंद्र पाटील : भद्रकाली, दिलीप ठाकूर : सरकारवाडा, श्रीकांत निंबाळकर : गंगापूर, राजू पाचोरकर : म्हसरुळ, नितीन पगार : इंदिरानगर, प्रवीण चव्हाण : देवळाली कॅम्प, गणेश न्याहदे : आडगाव, विजय पगारे : उपनगर, प्रमोद वाघ : अंबड, रियाज शेख : सायबर, रंजित नलावडे : गुन्हे शाखा २, भगीरथ देशमुख : आर्थिक गुन्हे, सुभाष पवार : पीसीबी-एमओबी, इरफान शेख : पोलीस कल्याण व प्रशिक्षण, कुंदन जाधव : विशेष शाखा, अशोक साखरे : नियंत्रण कक्ष, शंकर खटके : विशेष शाखा, सुभाष ढवळे : वाहतूक-१, सोहन माछरे : वाहतूक-२, अशोक नजन : अंबड, तुषार अढावू : सरकारवाडा, जितेंद्र सपकाळे : पंचवटी

सहायक आयुक्तांचीही अदलाबदली

गुन्हे सहायक आयुक्त वसंत मोरे सेवानिवृत्त झाल्यानंतर निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे हे शहर आयुक्तालयात हजर झाले. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सहायक आयुक्तांच्या जबाबदारीतही बदल केले आहेत. त्यानुसार तांबे यांना मुख्यालयात नेमण्यात आले. तर, मुख्यालयाची जबाबदारी असलेल्या डॉ. सीताराम कोल्हे यांना गुन्हे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह वाहतूक शाचे सहायक आयुक्त नितीन जाधव यांना पंचवटी विभागाची जबाबदारी दिली आहे. तसेच शेखर देशमुख यांच्याकडे अंबड विभागाची जबाबदारी कायम ठेवत विशेष शाखेचे सचिन बारी यांच्याकडे वाहतूकचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -