घरमहाराष्ट्रनाशिकदेशी बनावटीच्या बंदुक, तीन जिवंत काडतुसांसह नाशिकरोडला एकाला अटक

देशी बनावटीच्या बंदुक, तीन जिवंत काडतुसांसह नाशिकरोडला एकाला अटक

Subscribe

नाशिकरोड येथील नारायण बापू नगरजवळ गुन्हे शोध पथकाने विक्रीसाठी एका देशी बनावटीच्या बंदुकीसह तीन जिवंत काडतुसे आणलेल्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली. मंगळवार, २९ जानेवारीला रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.

एक व्यक्ती जेलरोड भागातील नारायण बापू नगर चौकात बंदूक व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणत असल्याची अशी गुप्त माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, जी. एस. जगदाळे, पोलीस हवालदार के. टी. गोडसे, ए. बी. शिंदे, पी. बी. ठाकूर, राहुल जगताप आदींच्या पथकाने नारायण बापू नगर चौकात सापळा रचला होता. त्यात देवळाली शिवारातील श्यामकुमार रामकीसन मिस्त्रा याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत त्याच्या कमरेला ३० हजार ५०० रपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -