घरमहाराष्ट्रनाशिकधन्यवाद मोदीजी, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नसल्याची पावती दिली; कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

धन्यवाद मोदीजी, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नसल्याची पावती दिली; कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने विविध आरोप केले जात होते. आता आमच्या पक्षाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान देऊन आमचा पक्ष भ्रष्टाचारी व परिवारवादी नसल्याची अप्रत्यक्ष पावती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, असा आगळा वेगळा फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी लावला आहे. सध्या हा फलक चर्चेचा विषय ठरतो आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांच्या गटात कोण तर अजित पवारांच्या गटात कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष परिवारवादी आहे. त्याच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत.

- Advertisement -

त्यात सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा अशा विविध आरोपांचा उल्लेख केला होता. एक आठवड्याच्या अंतराने या पक्षाचे नेते अजित पवार यांनी चाळीस आमदारांसह भाजप सरकारला पाठींबा दिला. त्यातील नऊ जणांना मंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे या पक्षात पडलेल्या फुटीबाबत आता राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा आहे. हा धागा पकडूनच शिरसाठ यांनी मोदीजी आणि भाजपला खोचक चिमटा घेत त्यांचे आभार व्यक्त करणारा फलक लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -