घरताज्या घडामोडीCorona: नवी मुंबईत २३६ तर पनवेलमध्ये ८२ रुग्ण वाढले!

Corona: नवी मुंबईत २३६ तर पनवेलमध्ये ८२ रुग्ण वाढले!

Subscribe

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज तब्बल २३६ तर पनवेल मनपा क्षेत्रात ८२ नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजार ६२९ वर गेला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज तब्बल २३६ तर पनवेल मनपा क्षेत्रात ८२ नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजार ६२९ वर गेला आहे. तर पनवेल मधील रुग्णांची संख्या १ हजार ६१२ वर गेली आहे. तर नवी मुंबईत आतापर्यंत ३ हजार १८८ रुग्ण बरे झाले असून २ हजार २५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा १८९ आहे. पनवेलमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ९० आहेत. तर ४५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पनवेलकरांची चिंता अधिक वाढली आहे. तर पनवेल ग्रामीण भागात आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण शिरढोण ३, उलवे ४, पारगाव १, वडघर २, करंजाडे ३, चिखले २, उसरली खुर्द १, चिंचपाडा २, भोकरपाडा १, वावंजे ३, कोळवाडी २, आकुर्ली ४, विचुंबे ४, सुकापुर २, तरघर १, कोळखे १ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

चार रुग्ण झाले बरे

दरम्यान, पनवेल ग्रामीण भागात विचुंबे येथील २, आकुरली येथे १ तर उलवे याठिकाणी १ जण बरा झाला असून आज दिवसभरात चार जण बरे झाले आहेत.


हेही वाचा – पुणे : दिवसभरात ८२० रुग्णांची नोंद; तर १३ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -