घरताज्या घडामोडीNawab Malik ED enquiry: हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र; राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन...

Nawab Malik ED enquiry: हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र; राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचा आरोप

Subscribe

गेल्या सात तासांपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप विरोधात बोलल्यामुळे हे सूडबुद्धीने केले जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत. तसेच आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजिद मेमन यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच हे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र असल्याचा आरोप माजिद मेमन यांनी केला आहे.

‘फडणवीस सरकार पाडण्याची संधी सोडत नाहीत’

नवाब मलिकांवर ईडीकडून केलेल्या कारवाईनंतर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजिद मेमन म्हणाले की, ‘जेव्हा २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपला मोठा धक्का बसला. देवेंद्र फडणवीसांना जो काही खेळ खेळायचा होता, तो खेळून सुद्धा भाजप सरकार पडले गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. ज्या दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांकडून मुख्यमंत्री पद गेले त्या दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार कसं पाडायचं, याची कुठलीही संधी फडणवीस सोडत नाहीयेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे आम्ही वचन घेतलंय आज किंवा उद्या आम्ही हे सरकार पाडणार, मग कायदेशीर, गैरकायदेशीर, दादागिरीने काय वाटेल ते करू कुठल्याही मार्गाने आम्ही सरकार पाडणार. मागच्या दीड वर्षापासून हे सरकार चांगले काम करतंय तेव्हापासून काहीही विषय काढून हे सरकार पाडण्याचं काम केलं जातंय.’

- Advertisement -

‘देवेंद्र फडणवीस यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर जमीन व्यवहारासंबंधी काही आरोप केले होते. त्याच आरोपांवरून आज ईडी कारवाई करत असल्याचे माध्यमातून कळते. चार महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले होते. तरीही २००५ सालातील प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत असल्याचे भाजप आणि माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे. मागील काही काळापासून नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या गैरव्यवहारांबाबत मोहीम सुरू केली होती. त्या मोहीमेमुळे वानखेडेंना एनसीबीतून बाजूला केले गेले. त्यामुळेच कदाचित फडणवीस यांच्या आरोपांच्या चार महिन्यानंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत आहे,’ असा आरोपही माजिद मेमन यांनी केला.


हेही वाचा – Nawab Malik ED enquiry: नवाब मलिकांचा अनिल देशमुख करू नका, न्यायालयाचे दरवाजे खुले – चंद्रकांत पाटील

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -