घरमहाराष्ट्रतीन कोटी द्या, नवाब मलिकांना जामीन मिळवून देतो; दुबईतून फोन, गुन्हा दाखल

तीन कोटी द्या, नवाब मलिकांना जामीन मिळवून देतो; दुबईतून फोन, गुन्हा दाखल

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी ३ कोटी रुपये मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. नवाब मलिक यांचे पुत्र आमिर मलिक यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. दुबईतून फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.

नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीने चुकीच्या पद्धतीने अटक केली असून मला जामीन द्यावा अशी याचिका मलिक यांनी केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर आता मलिका यांच्या जामिनासाठी तीन कोटी रुपये मागितल्याचं समोर आलं आहे. नावब मलिक यांचा मुलगा आमीर मलिक यांच्या तक्रारीवरुन विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी इम्तियाजने दावा केला आहे की, तो नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली आहे. तीन कोटीची ही रक्कम बिटकॉइन्सच्या स्वरुपात मागितली. दरम्यान, या व्यक्तीने अमीर यांना दुबईहून फोन केला होता, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधी आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली आहे. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. नवाब मलिकांपुढे रितसर जामीन करण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याचे आदेश न्यायालयाने दिले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -