घरताज्या घडामोडीDRDO ने हायब्रिड तंत्रज्ञानाने 45 दिवसात विकसित केली इमारत, नव्या विक्रमाची नोंद

DRDO ने हायब्रिड तंत्रज्ञानाने 45 दिवसात विकसित केली इमारत, नव्या विक्रमाची नोंद

Subscribe

डिफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO) ने एका नवा विक्रमाची नोंद केली आहे. बंगळुरू येथे वैमानिक विकास प्रतिष्ठान (ADE) येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी इन्सिट्यूशनल टेक्नॉलॉजीचा वापर करत हा विक्रम करण्यात आला आहे. अवघ्या ४५ दिवसांमध्ये ही इमारत उभा करण्याचा रेकॉर्ड डीआरडीओने केला आहे. या इमारतीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. याठिकाणी भारतीय वायू दलासाठी लढाऊ विमाने विकसित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

काय आहे इमारतीचे वैशिष्ट्य ?

एकुण सात मजल्याची ही डीआरडीओने विकसित केलेली इमारत आहे. या इमारतीत भारतीय वायू सेनेसाठी पाचव्या पिढीच्या विमानांचा विकास करण्यात येईल. तसेच मध्यम वजनाच्या आणि दूरवर मारा करणाऱ्या विमानांचा विकास करण्यात येणार आहे. त्याठिकाणी इंस्टिट्यूट तसेच विकासाच्या सुविधाही असणार आहेत. एका अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानुसार डीआरडीओने एडीई, बंगळुरू येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी एक बहुमजली इमारतीची उभारणी ही अवघ्या ४५ दिवसात पूर्ण केली. या परिसरात उन्नत माध्यम लढाऊ विमान योजनेअंतर्गत लढाऊ विमाने तसेच उड्डाण नियंत्रण प्रणालीच्या विकासाच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

१५ हजार कोटींची योजना

भारत आपल्या वायु दलाच्या क्षमतावाढीसाठी उन्नत स्टील्थ सुविधांच्या माध्यमातून पाचव्या पीढीच्या मध्यम वजनाच्या तसेच दूरवर मारा करणाऱ्या लढाऊ विमानांच्या विकासासाठी योजनेवर काम करत आहे. या योजनेअंतर्गत सुरूवातीचा खर्च हा १५ हजार कोटी रूपये इतका आला आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एएमसीएच्या डिझाईन आणि प्रोटोटाईप नमुना विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वातील सुरक्षा विषयाच्या मंत्रीमंडळ समितीने मंजूरी प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संरक्षण मंत्र्यांनी आज या इमारतीचे बंगळुरू येथे उद्घाटन केले. या इमारतीची पायाभरणी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली होती. तर इमारतीच्या कामाला सुरूवात प्रत्यक्षात १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती. हायब्रिड निर्माण पद्धतीचा वापर करत अवघ्या ४५ दिवसांमध्ये ही इमारत पूर्ण करण्यात आली आहे. इतक्या कमी कालावधीत ही इमारत पूर्ण करण्याचा एक विक्रमच ठरला आहे. इतक्या वेगाने एखाद्या इमारतीचे काम हे पहिल्यांदाच झाले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -