घरमहाराष्ट्र'आता EVM नकोच' अजित पवारांचा यु टर्न

‘आता EVM नकोच’ अजित पवारांचा यु टर्न

Subscribe

ईव्हीएम मशीनबाबत कुठलीही शंका नसून ईव्हीएमवर माझा विश्वास आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मागे व्यक्त केले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना अजित पवारांनी मात्र ईव्हीएमबाबत विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीलाच घरचा आहेर दिला होता. मात्र आता राज ठाकरे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूका घ्याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचं वेगळं लक्ष असतं. या निवडणुकांना सामोरं जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत! अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या चिंतन बैठकीमध्ये शरद पवार यांनी ईव्हीएमला दोष दिला होता. मात्र याच बैठकीत अजित पवार यांनी ईव्हीएमला दोष न देता, जनतेमध्ये जाऊन काम करावे, असा सल्ला दिला होता.

- Advertisement -

हे वाचा – राज ठाकरेंच्या सर्वपक्षीय भेटींचं फलित; २१ तारखेला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा!

मात्र आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करत अजित पवार यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी लावून धरली आहे. “देशात पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्याचा आग्रह अजित पवार यांनी केला आहे. ज्या व्यवस्थेवर सगळयांना शंका आहे, ती व्यवस्था बदलली पाहीजे. तसेच काही लोक जागांचा अंदाज व्यक्त करतात आणि तितक्या जागा येतात हे अजब आहे, अशी शंका अजित पवार यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

देशात अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजपने जो अंदाज व्यक्त केला तसा निकाल लागला. अनेकांनी याबाबत ईव्हीएम मशीनवर निवडणूक होऊ नये, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबल यांनी देखील आपले म्हणणे मांडले. “अनेकांनी ईव्हीएम मशीनवर होणाऱ्या निवडणूकांवर अविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी हा लढा सुरू केला आहे. या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे”, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

हे देखील वाचा – ईव्हीएमचं आंदोलन सोडा, जनतेमध्ये जा; राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा सल्ला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -