घरमहा @२८८कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३८

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३८

Subscribe

भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ असून ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम (विधानसभा क्र. १३८) विधानसभा मतदारसंघ आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम हा क्रमांक १३ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्र आहेत. कल्याण पश्चिम हा २००९ च्या मतदारसंघ फेररचनेनंतर आस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ. या मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी असली २००९ ला इथल्या मतदारांनी मनसेचे प्रकाश भोईर आणि २०१४ ला भाजपच्या नरेंद्र पवार यांना पसंती दिली. आताही शिवसैनिकांनी या मतदारसंघावर हक्क सांगितला असला तरी त्यांना गावित फॉर्मुल्याची भिती वाटते.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले जुने पारंपारिक कल्याण शहर आणि नव्याने विकसित होत असलेले कल्याण शहर यांची सांगड घालणारा मतदारसंघ आहे. कधीकाशी बेतूरकर पाड्याच्या पुढे जंगल असलेल्या या शहराचा आज मात्र, अगदी खडकपाडा, आधारवाडी आणि त्याही पुढे जाऊन बापगाव, टिटवाळ्यापर्यंत विस्तार झाला आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १३

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या –

पुरुष – ,११,१३७
महिला – ,८५,८१४
एकूण मतदार – ,३६,९५१


विद्यमान आमदार – नरेंद्र पवार

 

नरेंद्र पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ५४, ३८८ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेनेचे विजय साळवी यांचा २ हजार २१९ मतांनी पराभव केला होता. कल्याण – डोंबिवली महापालिका २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • नरेंद्र पवार, भाजप ५४,३८८
  • विजय साळवी, शिवसेना – ५२,१६९
  • प्रकाश भोईर, मनसे २०, ६९४
  • सचिन पोटे, भारतीय राष्ट्रवादी कॉंग्रेस २०, १६०
  • प्रकाश मुथा, अपक्ष –, ८३४


नोटा – २४०६

मतदानाची टक्केवारी – ४४.९६


हेही वाचा – ठाणे लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -