घरताज्या घडामोडीकोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार 'प्लाझ्मा दान'

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार ‘प्लाझ्मा दान’

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड प्लाझ्मा दान करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर कोरोनावर मात करत ते घरी आले. दरम्यान, त्यांनी दोन महिन्यांनी पुन्हा एकदा आपली रक्त चाचणी केली आहे. त्यांचे अहवाल सामान्य आल्यानंतर त्यांनी आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार’ असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आव्हाड?

‘मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसांत मी हॉस्पीटलमध्ये जाऊन प्लाझ्मा डोनेट करणार आहे’.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर फिरतीवर असणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासन आणि पालिका प्रशासनाचा देखील समावेश होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्यावरील उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

- Advertisement -

‘गेल्या काही दिवसांपासून करोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आले असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,’ अशी भावनाही त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावर व्यक्त केली होती.


हेही वाचा – गणेशमूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -