घरमहाराष्ट्रइतके लाचार होऊ नका; महाराजांच्या पोशाखाची शान राखा!

इतके लाचार होऊ नका; महाराजांच्या पोशाखाची शान राखा!

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात असताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना मुजरा केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच नुसतं नावं घेतलं तरी तरुणांमध्ये राज्याविषयी स्वाभिमान संचारतो. त्यांची भूमिका, वेशभूषा सर्रास परिधान केल्या जातात. महाराजांची वेशभूषा परिधान करणाऱ्या सर्वसामान्यांना सुद्धा असामान्यत्व प्राप्त होतं. परंतू महाराजांच्या याच वेशभूषेचा अवमान आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये हे प्रत्येक अधिवेशनात विविध वेश धारण करुन विधीमंडळात येतात आणि आपले प्रश्न हटके पद्धतीने उपस्थित करतात. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करुन आले होते. दरम्यान, विधान परिषदेने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान भवनात प्रवेश केला, त्यावेळी गजभिये यांनी त्यांना वाकून मुजरा केला. खरंतर महाराजांच्या वेशभूषेत असताना कोणालाही मुजरा करणं हा त्या व्यक्तीमत्त्वाचा अवमान ठरतो. मात्र महाराजांचे वंशज असलेल्या निंबाळकर राजेंसमोर प्रकाश गजभिये यांना त्याचे भान राहिले नाही. हा प्रकार तिथे उपस्थित सर्वांसाठीच धक्कादायक ठरला.

वाचा : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवाजी महाराज विधानभवनात

- Advertisement -

अधिवेशनात नेहमीच वेषांतर करतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये हे अधिवेशनात वेषांतर करून येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अधिवेशनात वेषांतर करून सहभाग घेतला आहे. यंदा शेतकरी आत्महत्या, कामगार, आदिवासी यांचे प्रश्न, आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी राज्य चालवा, असा संदेश देण्यासाठी महाराजांचा वेश त्यांनी परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -