घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांनंतर आता खासदार सुप्रिया सुळेंचाही स्वतंत्र दौरा

आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांनंतर आता खासदार सुप्रिया सुळेंचाही स्वतंत्र दौरा

Subscribe

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील स्वतंत्र संवाद दौरा काढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या तयारीसाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे, मात्र या यात्रेत सुप्रिया सुळे सहभागी झालेल्या नाहीत. २३ ऑगस्टपासून सुप्रिया सुळे आपल्या संवाद दौऱ्याचा पहिल्या टप्प्याची सुरुवात करत आहेत.

Supriya Sule ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019

- Advertisement -

पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रती सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांतील बहुविध घटकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. याच विषयांना घेऊन राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढलेला आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी आपला स्वतंत्र दौरा काढत सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

सुळे यांच्या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवीमुंबई या जिल्हयांमध्ये असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -