घरमनोरंजनVideo: किंग खानला आला फोन; तरी नाही मिळाले काम!

Video: किंग खानला आला फोन; तरी नाही मिळाले काम!

Subscribe

शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या परत येण्याची उत्सुकता असताना शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

बॉलिवू़ड विश्वातील किंग खान सुपरस्टार झिरो या चित्रपटानंतर शाहरूख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्यामुळे शाहरूखचे चाहत्याचे त्यांच्या येण्याची पुन्हा वाट पाहत आहे. यादरम्यानच, सध्या सोशल मीडियावर शाहरूख खानचा एक व्हिडिओ शेअर होताना दिसतोय. हा शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये शाहरुख कामासंबधी फोनवर बोलताना दिसतोय. काम मिळणार असे फोनवर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हासू आलेले दिसते आहे. या व्हिडिओला नेटफ्लिक्स इंडियाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. मात्र, हे एका वेब सीरिजचं प्रमोशन असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे किंग खाननं चित्रपटापेक्षा वेब सीरिजचा पर्याय निवडला की काय अशी चर्चा आहे. शाहरूख ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेब सिरीजची निर्मिती करणार हे त्यानं यापूर्वीच जाहीर केले होते. त्याच सिरीजच्या प्रमोशनचे हे व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

या वेबसिरिजचे दिगदर्शन रिभू दासगुप्ता हे करणार असून इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. किंगखान या व्हिडिओमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत असून फोनवर सांगतो की, मी इनटॅरोगेटरची भूमिका देखील साकारू शकतो, मी एक उत्तम अभिनेता आहे. परंतु, यानंतर त्य़ाला समजते की, ही भूमिका इंटेलीजेन्स एजन्सीकरिता आहे आणि तेवढ्यात फोन कट होतो. त्यानंतर ‘स्टोरी अभी बाकी है.’ असा मॅसेज स्क्रिनवर येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -