घरताज्या घडामोडीNCP : शरद पवारांच्या नव्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाला SCची मान्यता; निवडणूक...

NCP : शरद पवारांच्या नव्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाला SCची मान्यता; निवडणूक आयोगाला दिले निर्देश

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवे पक्ष चिन्ह तुतारी वाजवणारा माणून व राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवे पक्ष चिन्ह तुतारी वाजवणारा माणून व राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज (19 मार्च) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला. (NCP Sc Directs Ec To Recognise Sharad Pawars New Party Name Symbol)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळाबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजून दिला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं पक्षनाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले. मात्र, नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि पक्षाचे नाव राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे चिन्ह राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत, असे हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय, अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करावं, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – UDDHAV THACKERAY : सत्तेचा दुरुपयोग करून पैसा, त्या पैशातून पुन्हा सत्ता; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -