घरमहाराष्ट्रओमायक्रॉनच्या नव्या नियमावलीने उत्साहावर विरजण

ओमायक्रॉनच्या नव्या नियमावलीने उत्साहावर विरजण

Subscribe

देशात ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारानंतर आता राज्यात नव्याने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वर्षाखेरच्या पार्ट्या रोखल्या जाण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच वर्षाखेरच्या सोहळ्यांनाही अटकाव घालण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने लागू केलेल्या नव्या नियमावलीने उत्साहावर विरजण पडले आहे.

कोरोनाचे संकट असल्यानेच ओमायक्रॉन विषाणूही पसरत आहेत. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने लागू करण्यात आलेल्या सुचनांचा काटेकोरपणे अंमल करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार 31 डिसेंबर रोजी आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नका. घरीच साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. 25 डिसेंबरपासून रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी राहणार आहे.

या कार्यक्रमांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळा.

- Advertisement -

31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाट्यांवर नागरिकांनी गर्दी करू नये. नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुका काढू नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

शरद पवार होमक्वारंटाईन

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही; पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांनाही होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. शरद पवार यांनी आजच एका पुस्तक प्रकाशन समारंभाला हजेरी लावली होती. त्यानंतरच दुपारनंतर सुप्रिया सुळे यांच्या कोरोनाशी संबंधित ट्विट आल्याने आता शरद पवार खबरदारीचा उपाय म्हणून होमक्वारंटाईन करण्यात आले असल्याचे कळते.

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही; पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले आहे.

अलीकडेच हिवाळी अधिवेशनादरम्यानही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह एका आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर विधान भवनात ५० हून अधिक कर्मचार्‍यांना तसेच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरतेय की काय, अशी भीती व्यक्त होतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -