घरमुंबईहिंगोली-नांदेड मार्गावर भीषण अपघात

हिंगोली-नांदेड मार्गावर भीषण अपघात

Subscribe

चौघे जागीच ठार; २४ जखमी

हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की हे चौघेही जागीच मरण पावले. अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. पार्डीमोड शिवारात कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. 24 जखमींपैकी 6 जण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असलेल्यांना नांदेडला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. इतर जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेय.

राजस्थान नंबर प्लेटचा (आरजे 02 जीबी 3945) कंटेनर आणि एमएच 38 एएफ 8485 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स ही दोन्ही वाहने नांदेडकडे जात होती. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गतची हा भीषण अपघात घडला. नेमका कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisement -

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्समधील अनेक जण अपघातग्रस्त वाहनांच्या खाली दाबले गेले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. उपस्थित लोक आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहने घटनास्थळापासून दूरपर्यंत फेकली गेली होती.

मृतांची नावे
मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अजरसोंडा येथील त्रिवेणीबाई अजरसोंडकर आणि राजप्पा दगडू अजरसोंडकर यांचा समावेश आहे. तर उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विठ्ठल कणकापुरे यांचा तर कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील पंचफुलाबाई गजभार यांचा समावेश आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच दगावले. तर एक प्रवासी अपघातात मार लागून थेट ट्रकच्या खाली अडकला गेला. या प्रवाशाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. ट्रकच्या खाली अडकून पडलेल्या या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय एक महिला या अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -