घरमहाराष्ट्रदूध दरवाढीचे आंदोलन पेटले

दूध दरवाढीचे आंदोलन पेटले

Subscribe

दुधाचा टँकर फोडला , हजारो लिटर दूध रस्त्यावर

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता पहायला मिळत असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने जात होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केले. येथे दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलन केले.

दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी नवीन योजना
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -